महाराष्ट्र
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दिघेवाडी ता. सांगोला येथे आरोग्य तपासणी शिबिर.

सांगोला (प्रतिनिधी) दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवाडी या ठिकाणी श्रीमती गीता बनकर अध्यापक विद्यालय सांगोला येथील छात्र अध्यापकांचा छत्रसेवाकाल शिबिराचा दुसरा दिवस सुरू असताना श्रीनंद हॉस्पिटल सांगोला येथील तज्ञ डॉक्टर विनित दिघे व त्यांचे सहकारी विजय मोरे व विकास शिंदे यांच्या मार्फत प्रशालेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करून जे विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना योग्य औषधोपचार करण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तज्ञ डॉक्टरांनी आहार विषयक मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, व अध्यापक विद्यालयातील छात्र अध्यापक उपस्थित होते.



