महाराष्ट्र
श्रीधर स्वामी देवस्थान तर्फे ११ जणांना यशस्वी उद्योजक पुरस्कार जाहीर

संत कवी श्रीधर स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीधर स्वामी देवस्थान नाझरे ता. सांगोला तर्फे 11 जणांना यशस्वी उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे जयंत काका देशपांडे यांनी सांगितले.
सदरचा पुरस्कार सोहळा गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता नाझरे येथील श्रीधर स्वामी मंदिरात होणार असून, यशस्वी उद्योजकांमध्ये संजय महालिंग रायचुरे, फतरुद्दीन शेख, ज्योतिबा दत्तू, अतिश रजपूत, महेश विभुते, संजय सुतार, बाळासो रायचूरे, लक्ष्मण बनसोडे, हनुमंत गोसावी, सुखदेव वाघमारे, दीपक सरगर इत्यादींचा समावेश असून त्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे जगदीश देशपांडे यांनी सांगितले.