सांगोला तालुक्यातील धायटी ता. सांगोला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकापच्या सौ. आशा अविनाश सरगर यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आला.
यावेळी माणिकराव देशमुख, औदुंबर कांबळे, नेताजी पाटील, वसंत आलदर, सूरज बाबर, चैतन्य फुले, दिनेश बागुल, अमोल पाकले, किरण पवार, अनिल पवार, सागर वाघमारे, अझहर मुलाणी आदी उपस्थित होते. यावेळी नूतन सरपंच सौ. आशा अविनाश सरगर यांनी बोलताना सांगितले की, मला ही संधी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व संविधानाचे निर्माते भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळालेली असून आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचा कारभार करत असताना सर्वांना एकत्र घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. तसेच यथोचित सन्मान केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.