महाराष्ट्र
मुख्याध्यापक मायाप्पा गावडे यांचे अल्पशा आजाराने निधन

जवळा ता.सांगोला येथील रहिवासी व प्राथमिक शाळा पुजारवाडी ता.सांगोला या शाळेतील मुख्याध्यापक मायाप्पा कृष्णा गावडे (वय-54 वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
ते एक हुशार व मनमिळाऊ व्यक्ती होते.त्यांच्या पश्चात पत्नी,विवाहित मुलगी,दोन मुले,जावई,नातू,बहिणी असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.