सांगोला लायन्स कडून उद्या सांगोला विद्यामंदिर येथे हृदयरोग तपासणी शिबिर

लायन्स क्लब ऑफ सांगोला,सांगोला विद्यामंदिर परिवार व हृदयस्पंदन हॉस्पिटल पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने माजी प्रांतपाल ला. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि.१४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे हृदयस्पंदन हॉस्पिटल पंढरपूरचे डॉ.बसवराज कुंभार ( एमडी.डीएनबी (कार्डिओलॉजी) फेलोशिप इलेक्ट्रोफिजियोलॉजी ) यांचेकडून फक्त ६०० रुपये रजिस्ट्रेशनमध्ये CBC (सी.बी.सी),Creatinine Level (रक्त क्रिएटिनिन लेव्हल.),Suger,diabetes(शुगर टेस्ट),ECGReport (हृदयाचा ई.सी.जी रिपोर्ट) या तपासण्या व मोफत वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे तसेच गरजेनुसार 50% सवलतीमध्ये Thyroid (थायरॉईड),
Cholesterol(कोलेस्टेरॉल),ECO (इको ) Angiograpy अँजिओग्राफी, TMT (टी.एम.टी) टेस्ट केली जाणार आहे
तरी विद्यामंदिर परिवार व सांगोला शहर व तालुक्यातील गरजू लोकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड व लायन्स क्लब सांगोला अध्यक्ष उन्मेश आटपाडीकर यांनी केले आहे..