सांगोला शहरातील लक्ष्मण गणू चव्हाण यांचे बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. निधना समयी त्यांचे वय 82 वर्ष होते.
सांगोला शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती, ज्येष्ठ नेते हणमंतदादा चव्हाण यांचे ते पिताश्री होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 2 मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी आज शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 : 30 वाजता वाढेगाव नाका स्मशानभूमी येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.