सांगोला: लिफ्टच्या बहाण्याने महिलेस लुटले
सांगोला:- चार चाकी गाडीतून आम्ही तुम्हाला लक्ष्मी नगर येथे सोडतो असे सांगून ५५ वर्षीय महिलेचे ३३ हजार रुपयांचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे.
घटनेची फिर्याद सुनंदा लक्ष्मण गोडसे वय 55 वर्षे धंदा-शेती रा. लक्ष्मी नगर महुद ता. सांगोला यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिले आहे. याप्रकरणी अज्ञात महिला व पुरुषाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळालेले अधिक माहिती अशी केली, दिनांक 12/02/2025 रोजी 12.30 ते 1 वा. च्या सुमारास एक अनोळखी स्त्री (वय अंदाजे 30 वर्षे) व एक अनोळखी पुरुष (वय अंदाजे 35 वर्षे) यांनी पाढ-या रंगाची कार मधून फिर्यादी हे महूद येथे थांबले असताना फिर्यादी यांना लोटेवाडी रस्ता कोठे आहे आम्ही तुम्हाला लक्ष्मीनगर येथे सौडतो असे सांगुन कार मध्ये बसवून घेवुन जावुन सराटे नर्सरी जवळ कार मधुन उतरत असताना फिर्यादी यांच्या गळ्यातील 20,000/- रुपये किमतींचे 08 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व 13000 रुपये किमतीचे 07 ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ ही गाडीतील अनोळखी महिला व पुरुष यांनी संगणमत करुन हिस्सकावुन काढुन घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकाँ ढेरे हे करीत आहे.