महाराष्ट्र

शैक्षणिक क्षेत्रात सांगोला रोटरी क्लबचे कार्य उल्लेखनिय- श्रीमती आतार मॅडम.

सांगोला रोटरी क्लब विविध क्षेत्रात उल्लेखनिय सामाजिक कार्य करत असुन या वर्षी क्लबने आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच कौतुकास्पद कार्य केले आहे…असे गौरवोद्गार जि.प.प्राथमिक शाळा १,भोपळे रोडच्या शिक्षिका श्रीमती आतार मॅडम यानी काढले…

सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असल्यामुळे सांगोला रोटरी क्लबच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी बॉटल व खाऊवाटप कार्यक्रम घेण्यात आला..त्यावेळी श्रीमती आतार मॅडम बोलत होत्या..

सांगोला रोटरी क्लबने सर्वच शाळांना मदत केली असुन आमच्या शाळेत मेंदी प्रशिक्षण,नृत्य प्रशिक्षण,गणपती मूर्ती तयार करणे असे रोजगार निर्मितीस प्रेरणा देणारे कार्यक्रम सांगोला रोटरी क्लबने घेतल्या बद्दल त्यानी समाधान व्यक्त करुन आभार मानले.रो.प्रा.राजाभाऊ ठोंबरे व रो.अरविंद डोंबे गुरुजी यानी विद्यार्थ्यांशी संवाद साधला..प्रारंभी अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे यानी प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वस्तूवाटप होत असल्याचे मत व्यक्त केले..या प्रसंगी रो.सौ.मंगल चौगुले,रो.इंजि.सचिव विलास बिले,रो.इंजि.अशोक गोडसे,नृत्य प्रशिक्षक सौ.कल्याणी सपाटे, अँन.सौ.वर्षा देशपांडे उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button