महाराष्ट्र
रोटरी क्लब सांगोला यांचेकडून जि.प.शाळेत मोफत मेहंदी प्रशिक्षण शिबिर संपन्न

रोटरी क्लब यांचेकडून सांगोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,भोपळे रोड येथे मुलींसाठी मोफत मेहंदी प्रशिक्षण शिबिर देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी गरजू मुलीं निवडून त्यांना प्रशिक्षण,मेहंदी कोन, वही असे साहित्य मोफत देण्यात आले.हे मेंदी प्रशिक्षण सौ.कल्याणी सपाटे यांनी ७ दिवस घेऊन सहकार्य केले. यावेळी मेंदीचे सर्व प्रकार शिकवण्यात आले. या प्रसंगी रोटरी सांस्कृतिक विभाग प्रमुख रो.सौ. मंगल चौगुले यांच्या हस्ते कल्याणी सपाटे हीचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे म्हणाले असे प्रशिक्षण शिबिर मुलींना खूप उपयुक्त ठरते व त्यांच्या विचारांना चालना देण्याच्या दृष्टीने अशी प्रशिक्षणे रोटरी वारंवार देत असते.
याप्रसंगी मेंदी शिकलेल्या विद्यार्थिनी खूप आनंदी व भाऊक झाल्या होत्या.याप्रसंगी रो.अरविंद डोंबे गुरुजी यांनी मुलांना विविध खेळ गाण्यातून शिकवले.याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सौ. अत्तार मॅडम यांनी रोटरीच्या या उपक्रमाचे कौतुक करून रोटरीने शाळेमध्ये अजून शालोपयोगी कार्यक्रम घेत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी रोटरीचे सदस्य रो.राजेंद्र ठोंबरे रो.इंजि.अशोक गोडसे,रो. इंजि.हमीद शेख सो हजर रोटरी सचिव रो.इंजि.विलास बिले यांनी आभार मानले.या कार्यक्रमास सौ.वर्षा देशपांडे,सौ.राजश्री दौंडे व सौ. प्रियांका सपाटे व स्टाफ हजर होता.



