सांगोला (प्रतिनिधी) – मांजरी हायस्कूलचे रयत शिक्षण संस्थेचे उपशिक्षक प्रमोद अरविंद डोंबे यांचे दि. ३१ जानेवारी २०२५ ते ४ फेब्रुवारी २०२५ केंद्रीय शिक्षा संस्थान अंतर्गत रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन(RIE)भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी मल्टी लँग्वेज इन एज्युकेशन या विषयावर पाच दिवसीय केंद्रस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड व सादरीकरण झालेबद्दल श्री. विठ्ठल मल्टिस्टेटच्या महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
प्रमोद डोंबे हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती पुणेचे सदस्य असून इ. सातवी ते दहावी मराठी पाठ्यपुस्तक स्वाध्याय निर्मितीत प्रत्यक्ष सहभाग आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार इ. तिसरी ते दहावी अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे तज्ञ सदस्य म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या ४० शिक्षकांच्या टीम मधून त्यानी सिंगापूर अभ्यास दौराही पूर्ण केला आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ पुणे येथे इ.पाचवी, आठवी व दहावी मराठी विषयाची पुस्तक निर्मितीत त्यांचा सहभाग आहे.
सत्काराला उत्तर देताना प्रमोद डोंबे यांनी बँकेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले व सन्मान केलेबद्दल संस्थेचे चेअरमन व सर्व स्टाफचे आभार मानले. या सत्कार प्रसंगी संस्थेचे चेअरमन दिपक बंदरे, सौ सरस्वती पंडित, सौ स्वप्नाली फुले तसेच रोहिणी आमने, प्रीती हळ्ळीसागर, आमिर बागवान, आकाश उबाळे, राहुल सुरवसे ऋतिक भगत, संदेश भडकुंबे इ. सह सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.