महाराष्ट्र
प्राथमिक शिक्षकांना सहाव्या वेतनाचा फरक लवकर मिळावा.. अध्यक्ष वसंतराव दिघे

सन 2003 ते 2006 या कालावधीत ज्या प्राथमिक शिक्षकांची नेमणूक झाली त्यांना अद्याप सहाव्या वेतना वेतनाच्या फरकाच्या रकमा अद्याप गेली पंधरा वर्षे झाली तरी मिळाला नाही अशा 48 शिक्षकांना लवकर मिळावा असे निवेदन गटविकास अधिकारी उमेश चंद्र कुलकर्णी यांना सांगोला तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे, सल्लागार शंकर सावंत यांनी दिले.
सदर निवेदनाचा विचार करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी दिले असल्याचे संघटनेचे पदाधिकारी दिनकर घोडके, एकनाथ जावीर, दत्तात्रय खामकर यांनी सांगितले. यावेळी अर्थ विभागाचे जाधव उपस्थित होते.