महुद येथील जीबीएस रुग्णाची वैद्यकीय अधिकारी व विस्तार अधिकारी यांचेकडून विचारपूस

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यातील महुद गावामध्ये जीबीएस (गुलियन बॅरी सिंड्रोम्स) बाधित रुग्ण आढळून आल्याने तो पंढरपूर येथील एका हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असून रुग्णाची विचारपूस करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महूद येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण ढाळे, विस्तार अधिकारी मिलिंद सावंत, आरोग्य सहाय्यक नंदकुमार पोतदार, आरोग्य सेवक विजय दंदाडे व आबासाहेब गुरव यांनी भेट दिली .
त्यावेळी न्युरोफिजिशियन डॉक्टर राहुल नागणे यांनी त्यांना सीएसएफ व ईएमजी तपासणी केली असता जीबीएस ची प्राथमिक लक्षणे आढळून आल्याचे सांगितले असून तो रुग्ण जेबीएस पॉझिटिव्ह आहे व अर्ली डिसेक्शन आहे असे सांगून त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याची सोय केली आहे असे डॉक्टर सुरेंद्र काणे यांनी सांगितले असून पुढील उपचार हॉस्पिटलमध्ये थांबून घ्यावे लागणार आहेत असे सांगितले व सध्या पेशंटची तब्येत उत्तम व स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे या बाबत कोणताही धोका नाही.
जीबीएस रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे राज्यात जीबीएस बाधित रुग्णांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना सांगोला तालुक्यात पहिला रुग्ण सापडला आहे त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण झालेले आहे त्यामुळे आरोग्य विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावांमध्ये सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे घरोघरी जाऊन तपासणी मोहीम हाती घेतली आहे याच बरोबर ग्रामपंचायतला गावातील सांडपाणी व्यवस्थापन, गटार , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेची पाहणी, करण्याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला उमेशचंद्र कुलकर्णी व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांच्याकडून सर्व ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत
जीबीएस आजाराबाबत चे वेळेत गांभीर्य ओळखून न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणे यांचे मार्गदर्शक सूचनेनुसार कारवाई व प्रतिबंधात्मक उपाय योजना साठी अंमलबजावणी सुरू केली आहे याबाबत कोणी घाबरून न जाता नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी वैयक्तिक स्वच्छतेवर अधिक भर द्यावा. दूषित पाणी पिऊ नये, तसेच बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे, अचानक हाताला व पायाला अशक्तपणा येणे मुंग्या येणे, कमजोर वाटणे, इत्यादी लक्षणे आढळून आल्यास आल्यास तातडीने नजीकच्या सरकारी दवाखान्याची संपर्क साधावा असे वैद्यकीय अधिकारी कल्याण ढाळे यांनी सांगितले.