रूपाली पवार आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सांगोला तालुका पंचायत समिती व शिक्षण विभाग यांच्यावतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार चोपडी केंद्र अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद गणेश नगर शाळेतील सहशिक्षिका रूपाली पवार यांना देण्यात आला.
सांगोला येथील अहिल्याबाई होळकर सभागृहात नवनिर्वाचित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, केंद्रप्रमुख दिनकर गाडे, मुख्याध्यापक राजाराम बनसोडे,शहाजी बाबर, वैष्णवी बाबर,किशोरी बाबर, नयना पाटील, सुनिता विधाते,सीमा तोडकरी,माधुरी पाटील मंचावर उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश नगर येथे मुख्याध्यापक राजकुमार बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध उपक्रम रूपाली पवार यांनी राबवले आहेत. महिलांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम पालक सभा भारतीय संस्कृतीतील विविध प्रकारचे खेळ विविध प्रकारचे सण उत्सव तसेच सहशालेय उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले या कार्याची दखल घेत पंचायत समितीकडून त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
— ——- ———–
एखादा पुरस्कार आपल्याला मिळावा यासाठी मी शाळेत काम करत नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशालेयउपक्रमांचे आयोजन करीत असतो, शाळेच्या परिसरात असणारे पालक व शिक्षणप्रेमी लोक विविध प्रकारच्या उपक्रमांना प्रतिसाद देत असतात. सदरचा पुरस्कार विद्यार्थ्यांच्या कला गुणांप्रती समर्पित करीत आहे…..
… रूपाली पवार
(सहशिक्षिका) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश नगर