सांगोला तालुका

डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या थेट इशार्‍याने अखेर रेल्वे प्रशासनाने घेतली दखल.

सांगोला-मिरज रेल्वे भुयारी मार्गाचे उर्वरित काम मार्गी लागणार

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुक्याचे अत्यंत महत्त्वाचे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी सांगोला मिरज महामार्गावरील रेल्वे भुयारी मार्ग गेले कित्येक दिवस नागरिकांसाठी खुला केला आहे. परंतु ठेकेदाराने दर्जेदार काम केले नसल्यामुळे त्यामुळे कामाचा दर्जा खालावलेला आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या इशार्‍यानंतर रेल्वे प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत एक परिपत्रक काढून दिनांक 07 नोव्हेंबर 2022 ते 27 नोव्हेंबर 2022 रोजी परिपत्रक काढून सांगोला मिरज महामार्ग रेल्वे गेट नंबर 32 येथील डांबरीकरण, व भुयारी मार्गाचे मजबूत काँक्रिटीकरण करण्याची माहिती रेल्वे मंडल अधिकारी पंढरपूर विभागाने तसे परिपत्रक काढून प्रसिद्धीकरण केले आहे.

अत्यंत वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे तो भुयारी मार्ग खरंतर सुरुवातीलाच परिपूर्ण व परिपक्व करायला हवा होता.कालांतराने पावसाचा जोर वाढल्याने पावसाच्या पाण्याचा प्रवाह या भुयारी मार्गामध्ये अडथळा निर्माण करू लागला. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांचे अतोनात नुकसान व हाल होऊ लागले. विशेषतः महिला वर्गांना याचा जास्त मनःस्ताप होऊ लागला.या भुयारी मार्गात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आजही चालू आहे.त्यामुळे या मार्गात मोठ्या खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.पाण्याच्या प्रवाहामुळे हे खड्डे प्रवाशांना दिसून येत नाहीत. त्यामुळे बर्‍याच जणांची वाहने फसलेली आहेत.विशेषतः टू व्हीलर गाड्यांचे प्रमाण जास्त आहे.

नेहमीच सांगोला तालुक्याच्या ज्वलंत प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करणारे,प्रसंगी आवाज उठवणारे, सांगोला तालुक्याच्या विकासाची जाण असणारे,अशा कामाच्या रूपाने घराघरांमध्ये प्रत्येकाच्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आदरयुक्त स्थान निर्माण करणारे,पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या सांगोला मिरज रेल्वे भुयारी मार्ग संदर्भात आवाहन व थेट इशारा दिला होता.त्याची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली.यावेळी रेल्वे प्रशासनाचे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले.व रेल्वे भुयारी मार्गाचा कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढावा अशी विनंती केल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!