सांगोला तालुका

शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने किल्ले बांधणी स्पर्धा व बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने दिवाळीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे भव्य किल्ले बांधणी, सजावट स्पर्धा सलग 14 व्या  वर्षीहि यशस्वीपणे घेण्यात आल्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संघटनेच्या स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे बनजगोळ तालुका अक्कलकोट चे सरपंच ,संघटनेचे मार्गदर्शक रामभाऊ शिंदे प्रा . प्रसाद खडतरे सर , नितीन गवळी सर,  श्रीनिवास केदार यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला .
महाराष्ट्रातील किल्ल्यांचा सर्वांगीण परिचय व गड संवर्धन या उदात्त हेतूने आयोजित केलेली अशोक कामटे संघटनेने किल्ले बांधणी स्पर्धा सलग 14 व्या वर्षीही सांगोल्यात दरवर्षीप्रमाणे उत्साहात पार पडली. या स्पर्धेला यावर्षीहि शहर व परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील मुलांनी सुवर्णदुर्ग ,खांदेरी (अलिबाग), प्रतापगड ,शिवनेरी तोरणा, सिंधुदुर्ग ,पन्हाळा गड, रायगड, सिंहगड, किल्ले या वर्षीच्या स्पर्धेचे आकर्षण ठरले.
सदर किल्ला स्पर्धेत कार्तिक दौंडे व ग्रुप, शिवराजे ग्रुप कोष्टी गल्ली,    यश बोत्रे, साहिल बोत्रे ,सोहम जाधव, अनुप पतंगे ,श्रीतेज गवळी, शंभूराजे पोळ, सोनल जवंजाळ या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
वेगवेगळ्या खुबी, वेगवेगळे संदेश देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून करण्यात आला. स्पर्धेतील किल्ले इतके अप्रतिम होते की परीक्षकांना पण प्रश्न निर्माण झाला कोणला नंबर द्यायचे पण संघटनेच्या परीक्षक समितीने ते कार्य यशस्वीरित्या पार पाडल्याचे गौरवोद्गार नितीन गवळी यांनी काढले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलकंठ शिंदे सर व आभार प्रदर्शन चारुदत्त खडतरे यांनी मानले.
विज्ञान विज्ञान युगात हरवलेले मुले मुक्त मैदानी खेळ खेळत नाहीत मात्र किल्ला स्पर्धेतून अनेकांच्या कलागुणांना वाव मिळाला असून कल्पनाशक्तीला चालना मिळाली आहे. गड-किल्ल्यांचे संवर्धन, ऐतिहासिक वारसांची जतन ही काळाची गरज बनली आहे. अशा या परिस्थितीत या संघटनेच्या दरवर्षीच्या उपक्रमातून किल्ल्याचे संरक्षण ही आपली जबाबदारी असल्याचा विचार बाल मनावर रुजवण्यात सहाय्य होत आहे. दिवाळीत किल्ला बनविण्याची प्रथा केवळ महाराष्ट्रात आहे याचा युवा पिढीला अभिमान हवा.                                           संस्थापक नीलकंठ शिंदे सर 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!