सांगोला तालुका

राजापुर येथे लोकसहभागातुन वनराई बंधाऱ्याची उभारणी

कृषि विभागाच्या सहकार्याने लोकसहभागातून वनराई बंधारे उभारावेत... कृषि विभागाचे आवाहन.

राजापुर ता. सांगोला येथे  ग्रामस्थ व कृषि विभाग यांचे वतीने काळ मंगळवार  दिनांक १५/११/२०२२ रोजी लोकसहभागातून ओढ्यावर वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. यावेळी तालुका कृषि आधिकारी शिवाजी शिंदे , सरपंच मुक्ताबाई कदम , गावातील ग्रामस्थ व कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी श्रमदान केले.
वानराई बंधाऱ्यामुळे पावसाळा संपल्यानंतर ओढा/नाल्यामधुन वाहुन जाणारे पाणी आडवले जाते. यासाठी सिमेंटची रिकामे झालेले पोते घेऊन पोत्यामध्ये माती/वाळू भरून एकावर एक थरामध्ये रचून ओढ्यामध्ये बांध घातला जातो. वनराई बंधाऱ्यामध्ये आडवलेल्या पाण्याचा उपयोग जनावरांना पिण्यासाठी , आजुबाजूच्या विहीरी व बोअरवेलमधिल पाणी पातळी वाढण्यास मदत होते, रब्बी व ऊन्हाळी पिकांना संरक्षित सिंचनासाठी उपयोग होतो. तालुक्यातील शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी कृषि विभागाच्या मदतीने जिथे जिथे ओढा/नाल्यातुन पाणी वाहुन जात आहे तिथे लोकसहभागातुन वनराई बंधारे उभारण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे यांनी यावेळी केले. यावेळी सरपंच मुक्ताबाई कदम , मंडळ कृषि आधिकारी प्रविण झांबरे , कृषि विभागाचे कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक व ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!