आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या कार्याचा गौरव*

प्रा.धनाजी चव्हाण यांचा शोधनिबंध सादर
सांगोला (प्रतिनिधी) ब्रिक्स ऑफ ट्रेडिशन मास्को,रशिया,रयत शिक्षण संस्था महाराष्ट्र,स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय आंतरविद्या परिषद नुकतीच एस.एम.जोशी कॉलेज पुणे येथे संपन्न झाली. यामध्ये प्रा.धनाजी चव्हाण सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला यांनी सादर केलेल्या ‘शिक्षणातील दीपस्तंभ कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके’ या शोधनिबंधामुळे गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या कार्याचा गौरव झाला.
या परिषदेचे उद्घाटन ब्रिक्स वर्ल्ड ऑफ ट्रेडिशन मास्को,रशिया अध्यक्ष लुदमीला शेकाचेव्हा यांचे हस्ते व मा. सेर्गेई मेश्चेर्याकोव्ह (मुंबईतील वाणिज्य सल्लागार, रशिया),
स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पुणे डॉ स्नेहल तावरे,एस,एम.जोशी कॉलेजचे प्राचार्य व विविध आंतरराष्ट्रीय व पुणे येथील मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.यावेळी कार्यक्रमामध्ये शोध निबंध ग्रंथ प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या परिषदेमध्ये देश विदेशातील विविध क्षेत्रातील पुरुष कर्तृत्वाचे योगदान (साहित्य, सामाजिक शास्त्रे, व्यवस्थापन, विधी, शैक्षणिक, वाणिज्य,विजान, सामूहरिक शास्त्र संरक्षण, शास्त्रज्ञ,कला ललित कला उपयोजित कला) या क्षेत्रामधून शोध निबंध मागवण्यात आले होते.यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामधून कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके यांच्या शैक्षणिक कार्याविषयीचा शोधनिबंध सादर करण्यात आला होता.यामध्ये गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी १९५२ मध्ये सांगोला तालुक्यामध्ये सांगोला विद्यामंदिरच्या रूपाने सर्वप्रथमम केलेली माध्यमिक शिक्षणाची सोय, विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व रचनात्मक विकासासाठी केलेले प्रयत्न,सुरू केलेले उपक्रम, त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जोपासलेला’गांधीवाद’व जोपासलेली’साने गुरुजींची’तत्व प्रणाली’, स्वातंत्र्य चळवळतील योगदान यासाठी तत्कालीन केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र्याच्या रौप्य महोत्सवी वर्षांमध्ये म्हणजे इ.स.१९७२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वतीने ‘ताम्रपट’ देवून व तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन झालेला सन्मान या बाबी उल्लेखनीय ठरल्या.या परिषदेसाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चौकट* कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे विचार व तत्व विद्यमान अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी निष्ठापूर्वक जोपासले आहे.त्यामुळेच स्थापनेपासून आजही विद्यामंदिर शिक्षण संकुलामध्ये शिक्षक भरतीसाठी पैसे घेतले जात नाहीत. हे जोपासलेले तत्व तसेच क्वालिटी आणि क्वान्टिटीध्ये प्रगतीपथावर असलेले विद्यामंदिर शिक्षण संकुल या शोधनिबंधातील उल्लेखनीय बाबींचे समारोपाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे डॉ.होमराजें गोवरीओस्क ज्येष्ठ व्याख्याते महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मोका मॉरिशस व स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डॉ. स्नेहल तावरे यांनी कौतुक करत वेगवेगळ्या क्षेत्रातील अलौकिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचे कार्य या परिषदेतून समोर आले व परिषदेचा हेतू साध्य झाला असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button