नॅशनल कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट & स्टडी सेंटर मधील विद्यार्थ्यांचे टायपिंग व स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेत नॅशनल कम्प्यूटर टायपिंग इन्स्टिट्यूट अँड स्टडी सेंटर मधील विद्याथ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या मधे अभिषेक वसंत मुळे याने मराठी मध्ये तर आकाश सुरेश कारंडे याने इंग्रजी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.
तसेच MPSC मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये नॅशनल कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट & स्टडी सेंटर मधील विद्यार्थी धीरज दिलीप लेडवे, चंद्रकांत विष्णू भोसले, गणेश जगन्नाथ कांबळे, रवींद्र कृष्णा माने, आकाश लहू माने, कोमल बाबासाहेब गळवे, प्रदीप रावसो सावंत, रमेश विठोबा विटेकर, मनोजकुमार सुभाष सावंत यांची महसुल सहाय्यक या पदावर तसेच महेश जगन्नाथ म्हेत्रे यांची महावितरण मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर निवड झाली. वरील विद्यार्थ्यांचा त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी गट विकास अधिकारी श्री. कुलकर्णी साहेब व महावितरण चे सहाय्यक अभियंता श्री. घोडके साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ व बुके देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी गट विकास अधिकारी श्री. कुलकर्णी म्हणाले की स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करत असताना वेळेचे काटेकोर नियोजन करून अभ्यास केल्यास आणि आणि मलाही पोस्ट मिळवायचीच आहे असा निर्धार केल्यास यश फार काळ लांब राहू शकत नाही सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांनी एवढ्यावरच न थांबता नोकरी करत पुढच्या परीक्षेची तयारी करावी असे सांगितले. तसेच महावितरण चे श्री घोडके यांनी विद्यार्थ्यांना जमिनीशी नाळ कायम ठेवून गोरगरीब जनतेची कामे करण्याचा कानमंत्र दिला. यावेळी विस्तार अधिकारी श्री. टकले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. रमेश विटेकर यांनी केले. व नॅशनल कंप्यूटर टायपिंग इन्स्टिट्यूट अँड स्टडी सेंटर चे संचालक रमेश फुले (सर) यांनी टायपिंग व अभ्यासिकेसाठी नवीन बँच सुरु असून सेंटर कडून राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. तसेच आभार प्रदर्शन श्री प्रसाद फुले यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.