महाराष्ट्र

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये GPAT यावरती मार्गदर्शन संपन्न

सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी GPAT मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.या मार्गदर्शनासाठी डॉ. विजयकुमार चाकोते ( संस्थापक, फार्मास्टार अकॅडमी, नांदेड) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी केले. यावेळी डॉ. विजयकुमार चाकोते यांनी  GPAT परीक्षेची पूर्वतयारी कशाप्रकारे करावी आणि प्रत्येक विषयाला किती महत्व असायला पाहिजे ते सविस्तर पद्धतीने मार्गदर्शन केले.
प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना कोणत्या प्रकारच्या ट्रिक्स वापरून तो विषय कसा आत्मसात करावा याबद्दल त्यांनी माहिती दिली. GPAT परीक्षा पास झाल्यानंतर मिळणारे मानधन हे किती असते व त्याचा कालावधी किती असतो यावर त्यांनी उपदेशन केले. रोज अभ्यास किती व कसा करायला पाहिजे या विषयावर चर्चा केली.
हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी  मा. प्राजक्ता रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय  अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.सदर कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय बैस, श्री. श्रीनिवास माने व इतर सर्व प्राध्यापक हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button