उत्कर्ष अकॅडमी तर्फे इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी BOARD,CET व NEET चे मोफत मार्गदर्शन वर्ग*
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान सांगोला संचलित उत्कर्ष अकॅडमी मार्फत इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड ,CET व NEET चे मोफत कोचिंग दिले जाणार असून ह्यासाठी विद्यार्थ्यांना दहावी मध्ये 85% पेक्षा जास्त मार्क व पालकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत असणे गरजेचे आहे.
सदर कोचिंग क्लास साठी कोणत्याही महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून या कोचिंग क्लास ची वेळ दुपारी एक ते सायंकाळी पाच पर्यंत असणार आहे ,यासाठी परगावच्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याकरता बसची व्यवस्था केलेली आहे.ह्या अभिनव ऊपक्रमा अंतर्गत सदर विद्यार्थ्यांना भविष्यातील अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी रुपये 25 हजार स्कॉलरशिप ची सुविधा उपलब्ध असून या कोचिंग क्लास साठी कराड येथील सुप्रसिद्ध जेके अकॅडमी मधील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे .सदर बॅच ही १० जुलै पासून सुरू होणार असून ह्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्र समन्वयक श्री गणेश भंडारे यांनी केले आहे.
संपर्क..9226024896