आमदार अॅड.शहाजीबापू पाटील यांचे हस्ते चिकमहुद येथे रब्बी ज्वारी पिक प्रात्यक्षिक बियाणे वाटप
सांगोला(प्रतिनिधी):-आमदार अॅड. शहाजीबापू पाटील विधानसभा सदस्य सांगोला यांचे हस्ते काल मंगळवार दि. 20/09/2023 रोजी मौजे. चिकमहुद ता. सांगोला येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पोष्टिक तृणधान्य व राष्ट्रीय कृषि विकास योजना मिलेट मिशन सन 2023-24 अंतर्गत रब्बी ज्वारी पिक प्रात्यक्षिक बियाणे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित शेतकर्यांना रब्बी हंगामाचे अनुषंगाने तसेच वेगवेगळ्या योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार अड.शहाजीबापू पाटिल यांनी बियाणे , शेततळे , ठिबक सिंचन , प्रक्रिया ऊद्योग यासारख्या कषि विभागाचे विविध योजनांचा लाभ घेणेबाबत आवाहन उपस्थित शेतकरी बांधवांना केले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (पि.एम.किसान) ई के.वाय.सी. व आधार सिडिंग प्रलंबित असलेल्या शेतकर्यांनी लवकरात लवकर ई के.वाय.सी. व आधार सिडिंग करून घेण्याचे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले. तालुक्यामध्ये रब्बी हंगामामध्ये रब्बी ज्वारी पिकाचे 4160 हे क्षेत्राचे प्रात्यक्षिक बियाणे 10400 शेतकर्यांना वाटप केले जात आहे.
यावेळी तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे , सरपंच रविंद्र कदम , माजी पंस सदस्य दादासाहेब लवटे, माजी नगरसेवक संजय देशमुख ,मंडळ कृषि आधिकारी अमोल अभंग , कृषि पर्यवेक्षक जाधव , प्रक्षाळे ,कृषि सहाय्यक वाघमोडे , अतार , नलवडे , वास्ते , चव्हाण ,सरतापे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.