मुर्तीचा राजा अरुणोदय गणेश मंडळांच्या वतीने शुक्रवारी रक्तदान शिबीराचे आयोजन

सांगोला(प्रतिनिधी):- मुर्तीचा राजा अरुणोदय गणेश मंडळ कुंभार गल्ली सांगोला यांच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त शुक्रवार दि 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत कुंभार गल्ली येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष चेतन कोवाळे सर यांनी दिली.
मूर्तीचा राजा अरुणोदय गणेश मंडळाकडून गेल्या 20 वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवित येत असतात. मंडळाकडून सामाजिक उपक्रम राबवून अनेक गरजूंना दिलासा देण्यात येत आहे यावर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे. रक्तदान करणार्यांना मंडळाकडून आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे.
तरी या रक्तदान शिबिरास सांगोला शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करावे असे आवाहन मूर्तीचा राजा अरुणोदय गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट:- यावर्षी मंडळाकडून गणेशोत्सव कालावधीमध्ये रक्तदान शिबीर, शालेय रंगभरण स्पर्धा व महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, होममिनिस्टर अशा विविध स्पर्धा राबविण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी 7709927931, 9022884026, 7875138181 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष चेतन कोवाळे सर यांनी केले आहे.
