फिरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावले

सांगोला(प्रतिनिधी):- मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमानी रोडवर फिरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 46,000/- रू किमतीचे 18.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हाताने हिसका मारून चोरून नेली असल्याची घटना केदारवाडी ते सांगोला रोडवर 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.45 वाजणेचे सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजणेचे सुमारास फिर्यादी सुरेखा बाबर व सुरेखा नलवडे या दोन महिला वॉकींग करीता नेहमी प्रमाणे घरातुन पायी चालत सांगोला केदारवाडी रोडने केदारवाडी पर्यंत गेल्या. त्यानंतर तेथुन परत माघारी घरी येत असताना केदारवाड़ी रोड़ने सांगोल्याचे दिशेने भारत केदार याचे घराचे जवळ सायंकाळी 06.45 वाचे सुमारास समोरून अचानक दोन लोक मोटारसायकलवर आले व आमचे बाजुला वळले. त्यातील पाठीमागील इसमाने गळ्यातील मंगळसूत्र हे जबरदस्तीने हाताने हिसका मारून चोरून केदारवाडीचे दिशेने निघुन गेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची फिर्याद सौ.सुरेखा बाबर यांनी दिली आहे. या घटनेमुळे महिलांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. अधिक तपास सांगोला पोलीस करीत आहेत.