महाराष्ट्र

सांगोला नगरपरिषद कार्यालय घरपट्टी, पाणीपट्टीचा भरणा करण्यासाठी सुट्टीचे दिवशी सुद्धा सुरू राहणार.

सांगोला नगरपरिषद कार्यालय घरपट्टी, पाणीपट्टी, गाळेभाडे, खुलीजागा भाडे भरण्याकरिता दि. 22 फेब्रुवारी 2025 पासून 31 मार्च 2025 पर्यंत शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवशीदेखील सुरू राहणार आहे.

सांगोला नगरपरिषद हद्दीतील घरपट्टी, गाळेभाडे, खुलीजागा भाडे याची प्रभावी वसुली करण्यासाठी श्री. सचिन पाडे, कार्यालय अधीक्षक, श्री. रोहित गाडे, कर निरीक्षक व श्रीमती प्रियांका पाटील, कर निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली 6 विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत. तसेच श्री. महेश राजपूत, श्रीमती अस्मिता निकम, कर व प्रशासकीय अधिकारी व श्री. करण सरोदे, पाणीपुरवठा अभियंता यांचे नेतृत्वाखाली पाणीपट्टी वसुलीची 3 पथके नेमलेली आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना उन्हामध्ये कार्यालयात येवून कर भरणा करणे शक्य होत नसल्यास त्यांनी पथक प्रमुख यांचेशी संपर्क साधल्यास त्यांची घरपट्टी, पाणीपट्टी त्यांच्या घरी येऊन स्वीकारण्यात येईल. मालमत्ता धारकांनी आपल्या घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकीत व चालू रकमेचा भरणा लवकरात नगरपरिषद कार्यालयात करावा, जे मालमत्ताधारक आपल्या थकीत रकमेचा भरणा 28 फेब्रुवारी पर्यंत करणार नाहीत, त्यांचेवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये नळ कनेक्शन तोडणे, थकीत गाळा भाडेकरू यांचे गाळे सील करून नगरपरिषदेच्या ताब्यात घेणे, इ.कटू कारवाई करण्यात येईल. हे कटू प्रसंग टाळण्यासाठी सर्व मालमत्ता धारकांनी आपल्या थकीत व चालू रकमेचा भरणा त्वरित नगरपरिषद कार्यालयात करावा, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button