वंदना पाटणे मॅडम यांना “अष्टपैलू साहित्य भूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार ” प्रदान

महुद केंद्रातील चव्हाणवाडी- शाळेतील आदर्श शिक्षीका श्रीमती वंदना पाटणे मॅडम यांना अष्टपैलू साहित्य भुषण राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून वंदना पाटणे मॅडम या सांगोला तालुका प्रा.शि.को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या माजी चेअरमन आहेत
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालिका, उत्कृष्ट रांगोळी रेखाटणाऱ्या, उत्कृष्ट कवयित्री, उत्कृष्ट लेखिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका, अनेक पुरस्कारांनी त्यांना या पुर्वी सन्मानीत करण्यात आले असून…त्या सोलापूर जिल्हा आदर्श शिक्षक समिती महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा, सोलापूर आकाशवाणी निवेदिका,जि.प.प्रा. शाळा चव्हाणवाडी शाळेतील आदर्श तसेच उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांचे नावलौकीक असून श्रीमती वंदना शरदचंद्र पाटणे मॅडम यांना अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई -यांच्यावतीने अक्षरमंच काव्यसमूहात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तीन वर्षे सहभाग घेऊन उत्तम कविता सादर केल्याबद्दल-“अष्टपैलू साहित्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार” नुकताच मिळाला आहे.
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई यांच्यातर्फे अष्टपैलू साहित्य भूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल महुद परीसरातुन पाटणे मॅडम यांचे अभिनंदन होत आहे. अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई हा पुरस्कार वंदना पाटणे मॅडम यांना अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईचे संस्थापक मा. श्री शिवाजी किसन खैरे सर यांच्याकडून बहाल करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, शाल व अष्टपैलूचा बॅच असे स्वरूप आहे.