शिवाचार्य व डॉक्टरांन कडून आदर्श माता चा सत्कार म्हणजे दुग्ध शर्करा योग – शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी

डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी व डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांचे कडून संत कवी श्रीधर स्वामी कर्तबगार महिलांचा सन्मान होणे म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे असे मत शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांनी श्रीधर स्वामी पुण्यतिथी निमित्त नाझरे तालुका सांगोला येथे आशीर्वाचनात सांगितले. अध्यक्षस्थानी डॉक्टर शिवाजीराव ढोबळे हे होते.
पतीच्या निधनानंतर स्त्रीचे जीवन जगणे अवघड जाते, अनेक जण अनादर करतात व अशा परिस्थितीत नाझरे येथील महिलांनी मुलावर संस्कार करून शिक्षण व देशाच्या संरक्षणाची जबाबदारी देऊन पूर्ण केली त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने आदर्श माता आहे व त्याचबरोबर नवदुर्गा आहेत यापुढेही त्यांचे काम आदर्श होईल असे आशीर्वाद धारेश्वर महास्वामींनी यावेळी दिला.
सुरुवातीस हा सत्कार करण्याचा उद्देश व स्वरूप याची माहिती सोसायटी चेअरमन सुनील बनसोडे यांनी सांगितली. यावेळी सौ साक्षी जगदीश देशपांडे यांनीही योग्य सत्कार असल्याचे व या कामी सासरे जयंत देशपांडे यांनी पुढाकार घेतला व सत्कार घडवून आणला असे मत व्यक्त केले.
जयंत देशपांडे व कुटुंबीयांनी स्त्रियांचा सत्कार आयोजित करून त्यांना मानसन्मान मिळवून दिला व सुंदर असा सोहळा घडवून आणला व या आदर्श मातांचे मुले उच्च पदावर कार्यरत आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने आदर्श माता आहेत असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी व्यक्त केले. यावेळी आदर्श माता सौ छाया माने, सौ विमल भंडारे, बेबी सुमय्या शेख, मालन गोसावी, जानकी निंबाळकर, नागिन कुळोळ्ली, सविता लोहार, कांचन विभुते, पप्पा बाई पांढरे इत्यादी आदर्श मातांचा भव्य सत्कार करण्यात आला. श्रीधर स्वामी यांच्या वंशज आदर्श माता निर्मला देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. यावेळी अशोक पाटील, महेश विभुते, बाळू काका देशपांडे, उद्योजक दत्तात्रेय आदाटे ,अप्पू राज आदाटे ,मुकुंद पाटील, राजकुमार रायचूरे, नंदकुमार रायचूरे, अशोक गोडसे, अरुण शेटे, जगदीश देशपांडे, जयंत काका देशपांडे व कुटुंबीय तसेच महिला उपस्थित होत्या. शेवटी आभार रविराज शेटे यांनी मानले.