sangola

दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजेच ‘आण्णा’-आमदार जयंत आसगावकर

मुख्याध्यापक आण्णासाहेब गायकवाड यांच्या सेवानिवृत्त निमित्त सत्कार संपन्न 

सांगोला (प्रतिनिधी):-प्रत्येकांच्या मदतीला धावून जाणारे, आपल्या भूमिकेशी ठाम राहणारे आणि राजकारण विरहित जीवन जगणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आण्णा गायकवाड. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अशीच आण्णासाहेब गायकवाड यांची ओळख आहे, असे उद्गार शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी काढले.

निजामपूर हायस्कूल, निजामपूर, सांगोला, सोलापूर या शाळेचे मुख्याध्यापक आण्णासाहेब गायकवाड आपल्या 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. या निमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार जयंत आसगावकर मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील व मा. आमदार भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते आण्णासाहेब गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

आण्णा गायकवाड यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देत आमदार जयंत आसगावकर म्हणाले, गेली 28 वर्षे आण्णा यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली. हा त्याच्या आयुष्यातील सुवर्ण काळच म्हणावा लागेल. कारण आज शिक्षण क्षेत्रात काम करणे अवघड बनले आहे. शासन नवनवीन आदेश काढून शिक्षकांना मेटाकुटीला आणत आहे. अशातच केंद्र शासन नवीन शैक्षणिक धोरण आणत आहे. मी निवडून आल्यानंतर अनेक प्रश्न मार्गी लावले.  दोन वेळा टप्पा वाढ केली, अघोषित शाळांना निधी मंजूर केला. आता शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी माझा लढा सुरू ठेवणार आहे. आण्णा गायकवाड यांच्या मैत्रीबद्दल आमदार जयंत आसगावकर दिलखुलास बोलले. आमदार जयंत आसगावकर म्हणाले, रात्री अपरात्री केव्हाही आण्णाला फोन केला की किती आण्णा लगेच मदतीला धावून येतात. तोंडावर एक आणि माघारी एक अशी वृत्ती त्यांनी कधीच जोपासली नाही. स्पष्टपणा हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा गुण आहे. अशी व्यक्ती मला दोस्त म्हणून भेटणे हे माझे भाग्य समजतो.

आम. भगवानराव साळुंखे म्हणाले, मितभाषी स्वभाव आणि सगळ्यांना घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आण्णासाहेब गायकवाड आहेत. त्यांच्याकडे बारकाईने पाहिल्यानंतर त्यांचे अनेक पैलू पहायला मिळतात. शिक्षणाबरोबरच त्यांनी संघटनेलाही महत्त्व देत काम केले. यापुढे ‘शिक्षण वाचवा, देश वाचवा’ यासाठी माझा लढा सुरू रहाणार आहे. या लढ्यात तुम्हीही सहभागी व्हा, असे आवाहन मा. आमदार साळुंखे यांनी केले. यावेळी इतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.

कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोलाचे अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख, सोमनाथ आवताडे, विठ्ठलराव शिंदे, निजामपूर गावच्या सरपंच  शीतल लवटे, अनंत वडगावकर, संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव बाबर, चंद्रकांत शिंदे, सुखदेव लवटे, सचिन नलवडे, अमृत पांढरे, प्रदीप महाले, श्रावण बिराजदार, सुनील भोरे, संजय वाले, एम. आर. पाटील, लक्ष्मण चेलगिरी, ज्ञानेश्वर कोळसे-पाटील, विनायक कुलकर्णी, परिचारक सर, कोळवले सर, सावंत सर, व्ही. जी. पोवार, सुरेश संकपाळ, बाबासाहेब पाटील, श्रीकांत पाटील, आकाराम पाटील, बाजीराव साळवी, शिवाजी कोरवी, कृष्णदेव बेहेरे, एम. जी. पाटील अजित रणदिवे, पोपट पाटील, अनिल चौगुले, एम. आर. चौगुले, बाबा शेलार, सुनील पाटील, एस. एम. नाळे, संजय पाटील, विजय जाधव, सुभाष कलागते, श्रीधर गोंधळी, शिवाजी लोंढे, रेवन आवताडे, रामचंद्र जानकर, आनंदराव मासाळ,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!