सांगोला तालुका

शहीद जवान बहु.सामाजिक संस्थेच्या लढ्याला अखेर यश- अच्युत फुले

भुयारी मार्गातील रोड काँक्रीटकरण व डांबरीकरण कामास 7 नोव्हेंबरपासुन होणार सुरवात

 सांगोला शहरातील मिरज रेल्वे गेटजवळील भुयारी मार्गात पाणी साचून वाहतुकीला अडथळा ठरत होता. या गंभीर बाबीकडे गेल्या अनेक दिवसापासून शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. त्या संदर्भात लवकरात लवकर कामास सुरुवात न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशाराही संस्थेचे संस्थापक अच्युत फुले यांनी दिला होता. या इशार्‍यानंतर व संस्थेच्या रास्त, योग्य मागणीचा गांभीर्याने विचार करत काल 5 नोव्हेबंर 2022 रोजी पत्रक काढून 7 नोव्हेंबर 2022 पासुन सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे शहीद जवान संस्थेच्या लढ्याला अखेर यश आल्यामुळे संस्थेच्या पदाधिकार्‍याचे प्रवासीवर्गांमधून कौतुक व अभिनंदन होत आहे.

भुयारी मार्गातील रोड काँक्रीटकरण काम तसेच रोडचे डांबरीकरण कामास 7 नोव्हेंबर 2022 ते 27 नोव्हेंबर या कालावधीमध्ये करावयाचे आहे. तरी शहरातील वाहतूक रेल्वे भुयारी मार्गातून व लेवल क्रॉसींग गेट नं 31 मार्गा वळवण्यात यावी. भुयारी मार्गाच्या रोड काँक्रीटकरणासाठी व डांबरीकरणासाठी 27 नोव्हेंबर 2022 अखेर रस्ता बंद करण्यात यावा अशी विनंती या परिपत्रकामध्ये सहा.मंडल इंजिनियर कार्यालय पंढरपूर यांचेकडून करण्यात आली आहे.

भुयारी मार्गात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरु होता.त्याचप्रमाणे भुयारी मार्गात दोन्ही बाजूने पाणी येत होते. तसेच मोठ्या खड्डयामुळे पाण्याचे तळे साचून राहत होते. त्यामुळे प्रवाशी वर्गाला तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागत होते. याकडे शहीद संघटनेचे लक्ष वेधले होते. त्यामुळे भुयारी मार्ग दुरुस्तीचे व रस्ता डांबरीकरणाचे काम त्वरीत तातडीने करण्याची मागणी शहीद जवान संस्थेकडून वारंवार लावून धरण्यात आली. व त्यासाठी रेल्वे विभागाकडे सातत्यान पाठपुरावा चालू होता. अखेर प्रशासनाला जाग आली असून भुयारी मार्गातील रोड काँक्रीटकरण व डांबरीकरण कामास 7 नोव्हेंबरपासुन होणार सुरवात होणार असल्यामुळे संस्थेच्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे संस्थापक अच्युत फुले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!