फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये लाँग रेंज कम्युनिकेशन विषयावरील मार्गदर्शन शिबीर संपन्न

सांगोला: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रमशील असणाऱ्या फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाने आयोजित केलेल्या आय.ओ. टी. आणि लाँग रेंज कम्युनिकेशन या विषयावर मार्गदर्शन संपन्न झाले. त्यासाठी रोहित एंटरप्रायजेस पुणे चे प्रोप्रायटर श्री.रोहित दणके यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख प्रा.महेश वाळुजकर यांनी सांगितले.
यामध्ये श्री.दणके यांनी रिमोट कंट्रोल वरील उपकरणांना असणारी अंतराची मर्यादा व त्यावर उपाय म्हणून अवगत झालेले आधुनिक तंत्रज्ञान यावर विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.राहुल काळे व प्रा.महादेव मोरे यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री.भाऊसाहेब रुपनर , कार्यकारी संचालक श्री. दिनेश रूपनर ,कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे ,पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.