कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे सांगोला महाविद्यालयात विधीज्ञ संघ व विधी सेवा समिती सांगोला मार्फत आयोजन

सांगोला / प्रतिनिधी: महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी दि 24 फेब्रुवारी 2025 रोजी तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ संघ सांगोला यांच्या वतीने कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी सांगोला न्यायालयाच्या न्यायाधीश मा.श्रीमती बी. एम. पोतदार (प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी,सांगोला) या उपस्थित होत्या. तर विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. श्री. आर. पी. चव्हाण, मा.एस.व्ही.चव्हाण मॅडम (उपनिरीक्षक,सांगोला पोलीस स्टेशन) व सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे सचिव मा ॲड. उदय(बापू) घोंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी केले व कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश सांगितला. आपल्या मनोगतातून त्यांनी मुला मुलीसाठी सुरक्षितते संदर्भातील बाबींचा उल्लेख केला.
यानंतर “पॉश कायदा-2013” या कायद्याचा उपनिरीक्षक मा.एस.व्ही.चव्हाण मॅडम यांनी अभ्यासपूर्वक उहापोह केला. महिलांना या कायद्यानुसार कोणत्या गोष्टीपासून संरक्षण मिळू शकते त्यासाठी पोलीस स्टेशनची मदत कशी घ्यावी यावर आपले सविस्तर विचार मांडले. तसेच मानसिक व शारीरिक ताणतणाव या विषयावर डॉ. स्मिता गव्हाणे यांनी आपले वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव संपन्न् मार्गदर्शन केले. विद्यार्थी अवस्थेतील ताण तणाव दूर करण्यासाठी उपाय योजना करताना कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात यावर आपले विचार स्पष्ट केले. तणाव मुक्त जगण्यासाठी योगा व ध्यान यांचा अवलंब कसा करावा हेही स्पष्ट केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश मा.श्रीमती बी.एम. पोतदार यांनी कामाच्या ठिकाणी महिलावर होणाऱ्या अत्याचाराविषयी कायद्यातील तरतुदी सांगितल्या. तसेच महिलांना अशा प्रकारच्या अन्यायाला तोंड देताना नेमके काय करावे यावर आपले मत व्यक्त केले. सुदृढ समाज निर्मितीसाठी आपण सर्वांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचा लाभ महिला कर्मचारी तसेच महाविद्यालयातील 350 हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी महिला तक्रार निवारण समिती, ॲड. राजेश्वरी केदार मॅडम, लिपीक श्री. हाके व आय.क्यु.ए.सी. यांचे बहुमोल सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. चित्रा जांभळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. संतोष कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास सांगोला पोलीस स्टेशनचे मा. राऊत साहेब, मा. कुंभार साहेब आवर्जून उपस्थित होते. तर सांगोला न्यायालयातील पदाधिकारी व सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. राम पवार, तसेच महाविदयालयातील प्राध्यापक व प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.