महाराष्ट्र
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगोले वस्ती शाळेचे ‘शिवणे फेस्टिवल’ मध्ये घवघवीत यश

सालाबाद प्रमाणे शिवणे या ठिकाणी दिनांक 18 फेब्रुवारी 2025 पासून शिवणे फेस्टिवल अंतर्गत शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येतात. सदर स्पर्धांमध्ये हॉलीबॉल स्पर्धा, वैयक्तिक व सांघिक नृत्य स्पर्धा, रंगभरण स्पर्धा व इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमावर होणारी कोण होईल शिवविजेता स्पर्धा. सदर स्पर्धांमधील कोण होईल शिवविजेता या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगोले वस्ती, केंद्र कडलास या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले
राजवीर विजयसिंह घाडगे व अजय संजय कोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. उत्कर्ष सुभाष क्षीरसागर, विराज भाऊसो सूर्यवंशी व प्रियल दत्तात्रय पवार या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. संस्कार दगडू जगताप या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. तसेच या शाळेतील विद्यार्थिनी आर्या अमर गोसावी हिचा रंगभरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगोले वस्तीचेच सर्व विद्यार्थी शिवविजेता झाल्याने शिवने ग्रामस्थांनी श्री चतुरगुण औताडे सर यांचा विशेष असा सत्कार केला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगोले वस्तीच्या या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री चतुर गुण रावसाहेब औताडे व सहशिक्षिका मनीषा निकम मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशासाठी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बजरंग इंगोले पालक व ग्रामस्थ यांच्याकडून कौतुक होत आहे.