महाराष्ट्र
रोटरी च्या वर्धापन दिनानिमित्त सांगोला क्लबच्या वतीने जनजागृती रॅली संपन्न…

२३ फेब्रुवारी जागतिक रोटरी दिन.२३ फेब्रुवारी १९०५ रोजी रो.पॉल हॅरिस व त्यांच्या तीन मित्रांनी रोटरी क्लब ची स्थापना केली.आज ही संस्था जागतिक स्तरावर अत्यंत उत्कृष्टपणे सामाजिक कार्य करत आहे. या दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने आज जनजागृती रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये रोटरीच्या सर्व उपक्रमाची माहिती दिली. तसेच सर्व फोकस एरिया चे बोर्ड तयार करून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅली ची सुरुवात महात्मा फुले चौक येथून करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीची समाप्ती शिववंदनाने करण्यात आली.
यावेळी रोटरी चे अध्यक्ष रो.विकास देशपांडे यांनी रोटरीच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली.आज रोटरी स्थापन होऊन १२० वर्षे झाली व मोठ्या जोमाने सर्व जगभरात कार्य करत आहे. या कार्यक्रमास रो.विलास विले,रो.दीपक चोथे,रो.मधुकर कांबळे रो.मच्छिंद्र सोनलकर,रो.हमीद शेख,रो.संतोष भोसले,रो. मिलिंद बनकर,रो.संतोष गुळमीरे,रो.निळकंठ लिंगे,रो.सदाशिव पुजारी,रो.निसार इनामदार,रो.रमेश अण्णा देशपांडे,रो. माणिक भोसले सो,रो. विजय म्हेत्रे,रो.सचिन पाटकुलकर,रो.राजेंद्र ठोंबरे,रो.महेश गवळी,रो.महादेव बोराळकर,रो.बापूसाहेब भाकरे, इत्यादी सदस्य हजर होते.