सांगोला महाविद्यालयामध्ये संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी

सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.
संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव देबूजी जिंगराजी जनोरकर असे होते. त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी व हातात गाडगे व झाडू असा होता म्हणून त्यांना गाडगेबाबा असे संबोधले जाऊ लागले. त्यांनी घर सोडून तीर्थयात्रा करत समाजातील अज्ञान, अनिष्ट रुढी, परंपरा चालीरिती दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी निरपेक्ष लोकसेवा केली असे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सुरेश भोसले यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. प्रकाश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ नवनाथ शिंदे, डॉ. अमोल पवार व श्री. अवधूत कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.