महाराष्ट्र
नॅशनल कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट & स्टडी सेंटर मधील विद्यार्थ्यांचे UPSC व MPSC परीक्षेत घवघवीत यश

नॅशनल कॉम्प्युटर टायपिंग & स्टडी सेंटर मधील चार विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये निवड झाल्याबद्दल सांगोला पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन जगताप यांच्या हस्ते शालबुके देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
नॅशनल कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट & स्टडी सेंटर भोपळे रोड सांगोला येथील विद्यार्थी पंकज सुतार याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Enforcement Officer) या पदी , तसेच संकेत संतोष भोसले याची (WRD Errigation Department) मंगळवेढा येथे, कोमल गळवे हिची महसूल सहाय्यक पदी, मनोज कुमार सावंत (Ex;Army) महसूल सहाय्यक पदी निवड झाली वरील विद्यार्थ्यांचा त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल नॅशनल स्टडी सेंटरच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना API सचिन जगताप म्हणाले की ,स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना वेळेचे काटेकर नियोजन करून अभ्यास केल्यास कोणतीही पोस्ट आपल्या हातात असते तसेच त्यांनी स्वतः आपण स्पर्धा परीक्षेची तयारी कशी केली याबाबत मार्गदर्शन केले व सांगोल्यासारख्या ठिकाणी अद्यावत अभ्यासिका चालू केल्याबद्दल स्टडी सेंटर चे कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात आपण परीक्षेचे कशी तयारी केली याबाबत माहिती सांगितली. स्टडी सेंटरचे संचालक रमेश फुले( सर) व प्रसाद फुले (सर) यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अच्युतराव फुले व आभार प्रदर्शन प्रसाद फुले (सर) यांनी केले.