महाराष्ट्र
रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रमास स्टीलचा सेट प्रदान..

रोटरी क्लब सांगोला ही संस्था नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी आघाडीवर असते.सांगोला येथे विना अनुदानावर चालवण्यात येणाऱ्या मातोश्री वृद्धाश्रम येथे त्यांची गरज ओळखून मदत करण्यात आली. यावेळी २५ लोकांसाठी स्टील ताटे वाट्या व ग्लास भेट देण्यात आले. या ठिकाणी राहणाऱ्या वृद्ध,ज्येष्ठ अशा लोकांना याचा वापर होईल या उद्देशाने ही वस्तू देण्यात आली.
यासाठी रोटरी सदस्याची बहुमोल मदत झाली. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाचे राहुल जाधव यांनी उपस्थिताचे स्वागत केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो.इंजि.विकास देशपांडे यांनी केले व रोटरीचा हात मदतीसाठी नेहमीच पुढे राहील असे सांगितले.या कार्यक्रमास वृद्धाश्रमातील सर्वजण तसेच रोटरी क्लबचे सदस्य रो.इंजि.विलास विले रो.शरणाप्पा हळळीसागर,रो.श्रीपती आदलिंगे,रो.विजय म्हेत्रे,रो.नीलकंठ लिंगे सर,रो.महादेव बोराळकर सर,रो.धनाजी शिर्के इत्यादी हजर होते.