फॅबटेक सिव्हील अभियांत्रिकी मध्ये ऑनलाईन गेस्ट लेक्चर संपन्न

सांगोला : येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस ,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागांतर्गत डॉ. संदिप माळी, ( प्राध्यापक, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी, पुणे) यांचे पदवीनंतर स्थापत्य अभियांत्रिकीमधील करिअरच्या संधी या विषयावर ऑनलाईन गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा.शिवानंद माळी यांनी दिली.
या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. संदिप माळी म्हणाले कि, स्थापत्य अभियांत्रीकी पदवी नंतर विविध क्षेत्रात नौकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागात जसे की पी.डब्ल्यु.डी, ईरिगेशन, एम.जे.पी, झे.पी., महानगरपालिका, टाऊन प्लानिंग इत्यादी, केंद्र शासनच्या विविध विभागात जसे की पोस्ट, रेल्वे, सी.डब्लू.सी., डिफेन्स, नी.री., सी.पी.ब्लू.डी इत्यादी, निम्न शासकीय विविध विभागात जसे की एन.टी.पी.सी., बि.एच.ई. एल., ओ.एन.जी.सी., ई.एस.आर.ओ., एच.पी.सी.एल., एस.ए.आय.एल., एम.आय.डी.सी. इत्यादी व खाजगी विविध क्षेत्रात जसे की रोड, ब्रिज, एव्हीगेशन, टॉवर, डॅम कन्स्ट्रक्शन इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत.
या व्यतिरिक्त व्यवसायासाठी सुद्धा बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. प्रथमत: शासकीय किंवा खाजगी बांधकाम ठेकेदार, दुसरे म्हणजे पर्यावरण, स्ट्रक्टरल, परिवहन, जिओटेक्निकल किंवा जल क्षेत्रात तज्ज्ञ इत्यादीमध्ये प्राविण्य व अनुभवाची आवश्यकता आहे. तिसरे म्हणजे स्ट्रक्टरल ऑडिटर म्हणून ईमारती, पाण्याच्या टाक्या, पूल व धरणे यामध्ये कामे करू शकता. चौथे म्हणजे सध्या प्रत्येक नगरपालिकेत किंव्हा महानगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापन व त्याची प्रक्रिया हा प्रश्न ऐरणीवर आहे. यामध्येही बऱ्याच संधी आहेत. असे सांगितले.
हे गेस्ट लेक्चर फॅबटेक चे चेअरमन मा. श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर , कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या गेस्ट लेक्चरसाठी डीन ॲकॅडमिक डॉ. शरद पवार, सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा.शिवानंद माळी , गेस्ट लेक्चर समन्वयक प्रा.अमोल मेटकरी यांच्यासह ,सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.