सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

जागतिक जल दिनानिमित्त बुद्धेहाळ येथे श्रमदान व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

 

जागतिक जल दिनाचे औचित्य साधून बुद्धेहाळ गावा मध्ये रक्तदान शिबिर त्याचबरोबर श्रमदान ही करण्यात आलं ॲड.धनवडे मॅडम भारत सरकार नोटरी मिळाले बद्दल गावच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला तसेच बुद्धेहाळ गावचे पोलीस पाटील गणेश लवटे यांचा जिल्हा पलीस पाटील संघटना पदी निवड झाल्या बद्दल नागरी सत्कार करण्यात आला.गावातील युवा वर्ग आणि एकंदरीतच सर्वांनी या कार्यक्रमासाठी खूप चांगला प्रतिसाद दिला.

 

यावेळी धनवडे मॅडम यांनी कायदा सुव्यवस्था आणि आत्ताची सद्य परिस्थिती यावर युवा कार्यकर्ता आणि सज्ञान नागरिक म्हणून , संविधानिक मूल्यांना धरून आपली कर्तव्य जबाबदारी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केलं तसेच सचिन लवटे जलतज्ञ कोरो इंडिया यांनी रक्तदानाबरोबर , श्रमदान व पाण्याचे महत्व ही किती महत्त्वाचा आहे हे समजावून सांगितले तसेच भविष्यात पाणी टंचाई येऊ नये म्हणून आता पासूनच कमी पाण्याची शेती , परसबाग , व जलसंधारण कामाला प्राधान्य दिले पाहिजे व किमान पाण्याचे पाणी सुरक्षित केले पाहिजे येणाऱ्या काळात दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे आता पासून सजग राहिले पाहिजे पाणी आणि आरोग्य , पाणी आणि शिक्षण , पाणी आणि अर्थकारण ,समाजकारण पाणी आणि महिला यांचे महत्व समजुवून सांगण्यात आले तसेच बुद्धेहाळ गावच्या आरोग्य सेविका सविता रुपनर मॅडम यांनी रक्तदान कोणी करावं आणि कोणी करू नये रक्तदान करण्यापूर्वीची काळजी आणि रक्तदान केल्यानंतरची काळजी तसेच रोगराई होऊ नये हेल्दी आरोग्य टिप्स देण्यात आल्या ,तसेच प्रमुख पावणे म्हणून प्रिंयका कोळी ,सरपंच सुगधा श्रीमंत गवंड ,

या कार्यक्रमास ग्रामपंचायत बुद्धेहाळ , मैत्री फाउंडेशन , रेवनील ब्लड बँक , अर्जुन जावीर , देवा लवटे , गजानन जावीर , अशोक कोळेकर , आणासो लवटे, अशा सेविका सविता करांडे , अशा सेविका अर्चना होवाळ , सतीश लवटे , विजय काळे , बाबासाहेब हिप्परकर, लव्हु गवंड , विश्वास लवटे , यशवंत लवटे , देवया लवटे ,नंदा होवाळ,जयशिंग लवटे ,संपत लवटे , रावसाहेब आलदर , रुपाली गवंड , अंकुश गळवे ,अर्जुन गुरव , अधिनाथ जावीर , किरण शिंगाडे , दादासो कोळेकर ,लक्ष्मी घाडगे अशा सेविका हातीद, इत्यादी व्यक्तींनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रयत्न केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!