महाराष्ट्र

स्पंदन आय सी यू.परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकाना चावा…नागरिकात भीतीचे वातावरण..

शहरातील जुना मेडशिंगी – आलेगाव रोड वर स्पंदन आय सी यू हे हॉस्पिटल आहे..या भागातील परिसरास समर्थनगर नावाने ओळखले जाते..गेल्या दहा वर्षात या भागाचा झपाट्याने विकास झाला असुन अनेक नागरिक प्लॉट घेवून सद्निका बांधून रहात आहेत..त्याच प्रमाणे  झपके यांचे कॉम्प्लेक्स आहे…यात अनेक नागरिक रहात आहेत…शिवाय डाळिंबाचे व्यापारी देखिल वास्तव्यास आहेत..उत्कर्ष विद्यालय,गीता बनकर विद्यालय व अध्यापक कॉलेज याच परिसरात आहे..त्यामूळे विद्यार्थी,पालक,नागरिक यांची सतत वर्दळ असते.ज्येष्ठ नागरिक,महिला सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी याच मार्गाला पसंती देतात..

 

मात्र गेल्या काही दिवसा पासून या परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे..ही कुत्री अचानक रस्त्यावर आडवी येतात,अंगावर येवुन भुंकतात..वाहनाचा पाठलाग करतात..मध्यंतरी पाटील परिवारातील काही पशूपालकांच्या म्हशींना कुत्र्याने चावा घेतला होता..त्यात दोन म्हशी दगावली,असे समजते…

 

काल रविवारी सकाळी परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त पशूवैद्यकीय पर्यवेक्षक बाजीराव येणपे हे त्यांच्या घराजवळ उभे होते.त्यावेळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक येवुन त्यांच्या पायाला चावा घेतला..स्पंदन आय सी यू जवळ असल्याने त्याना उपचार मिळाले हा भाग वेगळा..मात्र त्याच सुमारास या कुत्र्याने परिसरातील शहाजहान इनामदार,उत्कर्ष विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका संजीवनी भोसेकर,गणेश पाटील यांच्या पाच ते सहा नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याचे समजते..

 

हे वृत्त समजताच  पत्रकार प्रा.राजेंद्र ठोंबरे व सौ.मनिषा ठोंबरे यानी येणपे परिवाराची भेट घेतली..विशेष म्हणजे येणपे यांची दोनच दिवसापुर्वी एन्जियोप्लास्टी झाली आहे..हे वृत्त ठोंबरे यानी पत्रकार राजेंद्र यादव यांचेमार्फत मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी याना कळविले..सदर कुत्रे इतराना घातक ठरू नये,म्हणून मारल्याचे समजते…मात्र या परिसरात अनेक कुत्री असल्याने त्यांचाही बंदोबस्त करावा,अशी नागरिकातून मागणी आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button