सांगोला(प्रतिनिधी):-बंडगरवाडी नं.1 चिकमहुद ता.सांगोला येथील कासार ओढ्याचे उपओढ्याच्या बंधार्यामध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असल्याची घटना दि. 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. फिर्याद विशाल सुळ रा. चिकमहुद यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
याबाबत सांगोला पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी हे शेतीला पाणी देण्यासाठी शेतालगत असलेल्या कासार ओढ्याचे उप ओढ्याच्या बंधार्याजवळ मोटार चालु करण्यासाठी गेले असता त्यांना बंधार्यामध्ये दक्षिण बाजुचे कडेला अंदाजे 40 ते 45 वयाचा अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला.सदरचा इसम अंदाजे दोन दिवसापुर्वी पाण्यात पडुन बुडुन मयत झालेला असावा. अनोळखी मयत इसमास खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे उपचारास दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन उपचारापुर्वीच मयत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. पुढील तपास पोहेकाँ ढेरे हे करीत आहेत.