मराठी राजभाषा गौरव दिन फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात साजरा

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि. कॉलेज मध्ये जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, लाडके साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, ए.ओ.वर्षा कोळेकर, प्रा. हरिश्चंद्र केशव लिखे पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय देशमुख यांच्या हस्ते वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.मराठीदिनाचे औचित्य साधून इ. आठवीतील विद्यार्थ्यीनींनी सकाळचा दैनंदिन परिपाठ मराठीभाषेतून घेतला.
याप्रसंगी इ.पाचवीतील विद्यार्थी श्रेयश खंडागळे यांने मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व आणि कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर यांच्या साहित्याबद्दल माहिती सांगितली. इ.पहीली, दुसरी ,तिसरीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेची अस्मिता संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम,संत जनाबाई, मुक्ताबाई,छ.शिवाजी महाराज,छ.संभाजी महाराज अशा अनेक वेशभूषा करून संवाद सादर केले. तसेच “माय मराठी अमुची” या गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. इ. चौथीतील विद्यार्थ्यीनींनी मराठी भाषा साहित्याचे प्रकार ही लघूनाटीका सादर केली. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ .अमित रुपनर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री.दिनेश रूपनर, प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला .मराठी विभागाच्या शिक्षिका सौ.शितल बिडवे,सौ.विद्या नरूटे, सौ.नाजनिन मुलाणी यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शितल बिडवे यांनी केले.