महाराष्ट्र
डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाकडून फॅबटेक कॉलेज ऑफ बी. फार्मसीला “A” मानांकन…

डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाकडून फॅबटेक कॉलेज ऑफ बी. फार्मसी शैक्षणिक वर्ष 2023-24 ला “A” मानांकन मिळाले आहे. विद्यापीठाकडून शैक्षणिक तज्ञ म्हणून डॉ. आर. पी. मराठे (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी छत्रपती संभाजीनगर) आणि डॉ. के. बी. बुराडे (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड) यांनी कॉलेज परिसर, क्लासरूम, लॅबोरेटरी, सुसज्ज ग्रंथालय, संगणक कक्षाची तपासणी करून शैक्षणिक अहवाल सादर केला.
फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी मा. प्राजक्ता रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे यांनी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय बैस, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग या सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.