महाराष्ट्र
सां.ता.शि.प्र.मंडळ व सांगोला विद्यामंदिरचा ७३ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला व सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला ७३ वा वर्धापनदिन सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे ध्वजारोहण व विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास सेवानिवृत्त शिक्षकेत्तर कर्मचारी नागन्नाथ गयाळी, नारायण राऊत, गणपती खडतरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत,संस्था सदस्य चंद्रशेखर अंकलगी,दिगंबर जगताप, विजयसिंह चव्हाण, विद्यामंदिर परिवारातील सर्व सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,सांगोला विद्यामंदिर प्राचार्य अमोल गायकवाड,उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद,पर्यवेक्षक प्रदीप धुकटे,मच्छिंद्र इंगोले, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकातून प्रा.धनाजी चव्हाण यांनी पूज्य गुरूवर्य बापूसाहेबांनी विद्यामंदिरच्या रूपाने सृजनशील जीवनाची प्रयोगशाळा उभी केली असे सांगत विद्यमान अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,सर्व संस्था पदाधिकारी यांचे विधायक व्यवस्थापन व त्याला प्रशासकीय अधिकारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची मिळालेली साथ यातून विद्यामंदिर परिवाराची झालेली चौफेर प्रगती सांगितली.व संस्थापक अध्यक्ष कै.बापूसाहेब झपके व माजी अध्यक्षा कै.बाईसाहेब झपके यांचे अमोघ कार्य व विचार प्रमाण मानत त्याच्या कृतज्ञतापूर्वक स्मरणातून यापुढेही प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या स्वप्नातील देव विद्यामंदिरच्या रुपाने आदर्श पालक, प्रेमळ व गुणवत्तेचा आग्रह धरणारे शिक्षक आणि उत्तम शाळा म्हणून वेळोवेळी भेटेल असा आशावाद व्यक्त केला.
ध्ववजारोहण कार्यक्रमाचे निवेदन प्रा.डी.के.पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष नष्टे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सुरेश मस्तुद यांनी केले.