महाराष्ट्र
नाझरा येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा वर्धापन दिन संपन्न

नाझरा (वार्ताहर):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा 73 वर्धापन दिन नाझरा विद्यामंदिर प्रशाला जुनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूल येथे साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब सबके यांच्या प्रतिमेचे पूजन चिणके येथील सेवानिवृत्त सैनिक बाळासाहेब पाटील अंकुश मिसाळ व कमांडो रमेश विटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक वाटचालीचा व उत्कर्षाचा आढावा सुनील जवंजाळ यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यानंतर प्राचार्य बिभीषण माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीत, ध्वजगीत,राज्यगीत व संविधान सादर करण्यात आले,त्यानंतर कमांडो रमेश विटेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,यावेळी त्यांनी सैनिकी सेवेत असताना घडलेल्या चित्तथरारक प्रसंगांना उजाळा दिला. या कार्यक्रमास नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापिका मंगल पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप सरगर यांनी केले व उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांनी मांडले.