महाराष्ट्र
लक्ष्मीदेवी विद्यामंदिरमध्ये एम.एच. टी.- सी.ई.टी. क्रॅश कोर्स सुरु…

सोनंद( प्रतिनिधी)- इंजिनिअरींग, अॅग्रीकल्चर व फार्मसी प्रवेशासाठी महाराष् ट्र शासनामार्फत घेतल्या जाणार्या प्रवेश परीक्षेसाठी लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, सोनंद येथे सोमवार दि. ३ मार्चपासून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,जीवशास्त्र व गणित या विषयाच्या क्रॅश कोर्सचे उद् घाटन पुणे येथील टीचबीट एज्युटेकचे संचालक प्रा. स्वप्नील सर यांचे हस्ते सरस्वतीपूजनाने झाले.
टीचबीट एज्युटेक व लक्ष्मीदेवी विद्यामंदिर यांच्यात दीर्घकालीन स्वरुपाचा करार झाला असून,जून २०२५ पासून इ.११वी,१२वी या दोन्ही वर्गासाठी जेईई, नीट व सीईटी वर्षभर प्रोजेक्टरवर नियमितपणे लेक्चर्स होणार असून, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी देखील डाऊट क्लीअरींग सेशनच्या माध्यमातून सोडविल्या जाणार आहेत. आकाश,अॅलन तसेच आय.आय. टी. सारख्या नामवंत संस्थामधील प्राध्यापकांची लेक्चर्स होणार आहेत. पुणे, लातूर,कोल्हापूर या ठिकाणी जे शिकायला मिळते.त्याच दर्जाचे शिक्षण लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, सोनंद या ठिकाणी मिळू लागले आहे. तीस काॅम्प्युटर व अनलिमिटेड इंटरनेटद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार असून, काॅम्प्युटरद्वारे ( सीबीटी) टेस्ट सेरीज घेतल्या जाणार आहेत.
फक्त होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्क आकारुन प्रवेश दिला जाईल.क्रॅश कोर्स उद् घाटन प्रसंगी प्रा. स्वप्नील सर यांनी टीचबीट ही संस्था नेहमीच आपला अभ्यासक्रम स्टेट बोर्ड, सीबीएसई यांचेशी समानता साधते. स्पर्धेत टिकायचे असेल तर नेहमीच काळानुरुप बदल स्वीकारले, तर कोणतीच गोष्ट असाध्य नसल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक कोडग यांनी केले. या कोर्ससाठी संस्था अध्यक्ष मा.बाबासाहेब भोसले, सचिव मा.आनंदराव भोसले यांनी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
क्रॅश कोर्स यशस्वी करण्यासाठी प्रा. सुभाष आसबे, प्रा.विनायक कोडग, प्रा. आबासाहेब कोळी, प्रा. सौ. वर्षा जाधव, सौ. सविता कुंभार , प्रा. सतीश कांबळे, प्रा.सत्यवान शेजाळ मुख्याध्यापिका सौ.पुष्पा महांकाळ, प्राचार्य हेमंत आदलिंगे या सर्वांनीच परिश्रम घेतले.