जुनोनी येथे कवठेगुलंद ते अक्कलकोट दिंडीचे पाटील परिवाराच्या वतीने स्वागत…

कोळा वार्ताहरसांगोला तालुक्यातील जुनोनी येथील पाटील परिवाराने ५१ वर्षाची परंपरा जपत व कुटुंबीयांच्या वतीने श्री गजानन महाराज यांच्या कवठेगुलंद ते अक्कलकोट पादुका पदयात्रा दिंडीचे पूजन आरती प्रसाद कार्यक्रम भक्तिमय वातावरणात जोरदार स्वागत करण्यात आले. दिंडीचे प्रमुख कै ह भ प नारायण श्रीपाद काने बुवा महाराज आशीर्वादाने त्यांचे नातू संकेत भार्गव काणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडी सोहळा पार पडला जुनोनी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अक्कलकोट निवासी परम सद्गुरु श्री गजानन महाराजांची गेल्या ५१ वर्षापासून दिंडीची सेवा करण्याची परंपरा पुढे चालवत सिदा कृष्णा व्हनमाने राधाबाई सिदा व्हनमाने नारायण सिदा व्हनमाने विमल नारायण व्हनमाने यांच्या पश्चात व्हनमाने पाटील परिवाराची तिसरी पिढी दादासो नारायण व्हनमाने पाटील, शिवसेना उबाटा तालुकाप्रमुख अरविंदजी पाटील, दिनकर नारायण पाटील अखंड परंपरा दिंडीची सेवा चालू ठेवली आहे त्यांचे कौतुक होत आहे. या दिंडीचा उद्देश कीर्तनकार नारायण बुवा का महाराज यांनी कवठे बुलंद येथील दत्त मंदिर ते शिवपुरी अक्कलकोट येथील गजानन महाराज मंदिर दिंडी पदयात्रेस प्रारंभ केला होता
यावर्षी नारायण बुवा काणे यांचे नातू संकेत भार्गव काणे यांनी आजोबांची पायी दिंडी पदयात्रेची परंपरा कायम ठेवत या वर्षीच्या दिंडी पदयात्रेचे आयोजन या दिंडीमध्ये हजारो संख्येने भावी भक्तांनी उपस्थित लावली आहे या दिंडीसाठी सेवानिवृत्त पोलीस व्हनमारे साहेब पत्रकार जगदीश कुलकर्णी आवर्जून उपस्थित होते दिंडीचे जुनोनी नगरीत व्हनमाने पाटील परिवाराच्यावतीने इंद्रजीत व्हनमाने पाटील रणजीत व्हनमाने पाटील अभिजीत व्हनमाने पाटील सागर व्हनमाने यांनी परिश्रम घेतले दिंडी मार्गस्थ करण्यात आली.