sangola

सांगोला तालुक्यात रहस्यमयी आवाज

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यात काल शनिवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास रहस्यमयी आवाज आल्याने नागरिकांमधून भितीचे वातावरण तयार झाले होते. हा आवाज नेमका आवाज कशाचा या बाबत दिवसभर चर्चा सुरु होत्या.

परंतु, हा आवाज नेमका कुठून येतो, याचे कारण स्पष्ट झाले नाही. तालुक्यात अनेक गावांत सकाळी 9.30 वाजता मोठा आवाज ऐकायला आला. दरम्यान, जमिनीला काहीसा हादरा बसल्यासारखे झाले असून काही ठिकाणी बांधलेली जनावरे सुटली होती असे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले. मात्र हा आवाज कुठून आला याचा उलगडा करण्याची मागणी होऊ लागली आहे.

सांगोला तालुक्यातील अनेक खेडेगावात हा गुढ आवाज अनेकांनी ऐकला. आवाज आला तेव्हा घरातील लोक बाहेर येवून काय झाले याचा कानोसा घेत राहिले तर जे रस्त्यावरुन ये-जा करत होते, त्यांनाही हा आवाज ऐकू आला मात्र तो नेमका कशाचा? याची खातरजमा करता आली नाही. या आवाजाबद्दल अनेकांनी मोबाईलवरुन एकमेकांना विचारणा केली. दरम्यान यापूर्वीही सांगोला तालुका अशाच गुढ आवाजाने हादरला होता. तेव्हाही तात्कालीक चर्चेनंतर हा विषय मागे पडला होता. आता पुन्हा त्याची पुर्नरावृत्ती झाली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!