महाराष्ट्र
फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात “मराठी भाषा दिन” उत्साहात साजरा

कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात “मराठी भाषा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी मराठी भाषेचा गौरव आणि महत्व अधोरेखित करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलाने झाली. कार्यक्रमात कविता वाचन, कथाकथन, नाट्यप्रयोग, आणि गीत गायनाचे सादरीकरण झाले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी मा. प्राजक्ता रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय बैस उपस्थित होते