महाराष्ट्र
फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मधील पदविका अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची जे. बी. फार्मासुटिकल लिमिटेड, दमन येथील कंपनीला भेट

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मधील पदविका अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची जे. बी. फार्मासुटिकल लिमिटेड, दमन (गुजरात) येथील कंपनीला भेट देण्यात आली. यादरम्यान जे बी फार्मासुटिकल्सचे कार्यकारी उपसंचालक श्री. पी. बी. बंग यांनी विद्यार्थ्यांना ऍलोपॅथिक औषधे यांच्याबद्दल माहिती दिली व मार्गदर्शन केले. हि औद्योगिक भेट कॉलेजचे प्राचार्य डॉ संजय बैस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. श्रीनिवास माने व प्रा. सुरूची डोंगरे यांनी आयोजित केली होती.
या औद्योगिक भेटीसाठी संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी मा. प्राजक्ता रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, कॉलेजचे प्राचार्य डॉ संजय बैस यांचे मोलाचे सहकार्य लाभले