महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल चे गणित प्राविण्य परिक्षेत घवघवीत यश

सोलापुर जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परिक्षेत न्यू इंग्लिश स्कूल सांगोला मधील विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले आहे. गणित प्राविण्य परिक्षेत यश मिळवलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार न्यू इंग्लिश स्कूल चे उपप्राचार्य प्रा.संतोष जाधव तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संस्थासंचालक डॅा. अशोकराव शिंदे, प्रा. दिपक खटकाळे, न्यू इंग्लिश स्कूल चे उपमुख्याध्यापक प्रा. संजय शिंगाडे, पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर, दशरथ जाधव सर, तात्यासाहेब इमडे सर तसेच जेष्ठ शिक्षक औदुंबर कांबळे सर, माणिकराव देशमुख सर उपस्थित होते.
या यशस्वी विद्यार्थांनमध्ये इयत्ता पाचवी मधील आरती गणेश बनकर, अनुज अनिल आदलिंगे, अर्पिता प्रशांत तोरगळे, धनश्री दाजीराम माळी, क्षितिजा मनोज पवार, नितीन अजित राऊत, प्रतीक्षा बिराजी कोळेकर, सनाया इक्बाल पटेल, वैष्णवी कुलदीप ऐवळे व यश प्रशांत कांबळे तसेच इयत्ता आठवी मधील सानिका विजय केदार, सृष्टी सचिन सावंत आणि विश्वजीत विकास गायकवाड या विद्यार्थ्यांचा समावेश असुन सदरचे सर्व विद्यार्थी हे जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परिक्षेतुन प्रज्ञा परिक्षेस पात्र झालेले आहेत. यावेळी या विद्यार्थांना गणित प्राविण्य परिक्षेसाठी मार्गदर्शन करणारे निलोफर मुजावर मॅडम व राणी आदलिंगे मॅडम यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पालक पांडुरंग राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांसोबतच सर्वच शिक्षकांचे या यशात मोलाचे योगदान असून या ठिकाणी राबविण्यात येणारे सर्व स्पर्धा परिक्षा तसेच उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. आपले मनोगत व्यक्त करताना संस्थासंचालक डॅा. अशोकराव शिंदे  यांनी सदरच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील टप्यातील प्रज्ञा परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य फुले सर यांनी केले तर शेवटी आभार अविनाश सरगर सर यांनी मानले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाअध्यक्ष डॅा. अनिकेत देशमुख, संस्थासचिव विठ्ठलराव शिंदे सर, संचालक डॅा. अशोकराव शिंदे, प्रा. दिपक खटकाळे व प्रा. जयंत जानकर यांनी विशेष कौतुक करून पुढील प्रज्ञा परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button