महाराष्ट्र

सांगोला: पिग्मी एजंट लूट प्रकरण उघडकीस आणण्यास पोलिसांना यश; एकास अटक

सांगोला पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक ०३/०३/२०२५ रोजी रात्री ०९:४० ते ०९:५० वा दरम्यान मौजे सांगोला येथील सांगोला शहरातुन सांगोला मिरज रस्त्यावरून माउली वॉशींग सेंटरच्या जवळुन राउत मळयाकडे जाणारे ओडयाचे अलीकडील बाजुला असणा-या कच्या रस्तावर फिर्यादी नामे आबासो अशोक राऊत वय ३४ वर्षे, धंदा- नोकरी, पत्ता: राऊत मळा सांगोला ता सांगोला जि. सोलापुर हे सांगोला शहरातुन पिग्मीची रक्कम जमा करून त्यांचे राहते घरी जात असताना चार अनोळखी ईसमांनी त्यांना अडवुन त्यांचे डोळयात मिरची पुड टाकुन, दुखापत करून, त्यांचेकडील २५०००/- रोख रक्कम असलेली बॅग जबरीने चोरून नेल्याने त्यांचे फिर्यादी वरून सांगोला पोलीस ठाणे येथे गु र नं १८३/२०२५ बी एन एस २०२३ चे कायदा कलम ३०९ (६), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचा तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जगताप हे करीत आहेत.

 

सदरचा गुन्हा हा जाणीवपुर्वक दुखापत करून, जबरी चोरीचा गंभीर स्वरूपाचा असल्याने तात्काळ मा.पोलीस अधिक्षक सो श्री. अतुल कुलकर्णी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाणे कडुन दोन पोलीस पथके नेमण्यात आली.

 

वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील सपोनि सचिन जगताप, पोउप. निरीक्षक व्ही. व्ही. माहूरकर, पोहवा /१५४७ वजाळे, पोहेकॉ / ६०१ पलुसकर, पोकॉ/१७८ पांढरे, पोकॉ/८२५ आवटे, पोकॉ/१०५७ शिंदे, पोहवा/०८ पठाण यांनी गोपणीय बातमीदारमार्फत खात्रीशीर माहीती प्राप्त करून गुन्हयातील मुख्य आरोपीत नामे शेखर शशिकांत कारंडे वय २० वर्षे मुळ रा. मठावीवाडी फलटण ता.फलटण जि. सातारा सध्या रा सोनंद ता सांगोला जि सोलापुर यास बुद्धी कौशल्याने व चातुर्याने आरोपीत यास फलटण शहर पोलीस ठाणे ता फलटण जि सातारा येथुन ताब्यात घेतले. त्यास गुन्हयाबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता असता आरोपीत याने गुन्हयाची कबुली दिल्याने व आरोपीचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दि.०६/०३/२०२५ रोजी अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपीस मा न्यायालामध्ये हजर केले असता मा. न्यायालयाने अटक आरोपी यास ०५ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हयाचा अधिक तपास चालुआहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button